पुरेसे पाणी प्यायल्याने दीर्घ आणि निरोगी आयुष्य कसे प्राप्त होते .

Publish Date:7/7/2023 9:00:00 AM

पुरेसे पाणी प्यायल्याने दीर्घ आणि निरोगी आयुष्य कसे प्राप्त होते .

Wavelets.in

आपल्या शरीरात योग्य शारीरिक प्रक्रिया राखण्यासाठी पाणी पिणे हे नेहमीच निरोगी लक्षण मानले जाते. आपल्या शरीरात काही मिनिटांत लाखो एन्झाइमॅटिक प्रतिक्रिया होतात.या प्रतिक्रिया मध्ये पाणी आवश्यक पोषक म्हणून कार्य करते.जर तुम्हाला दीर्घायुषी आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर हायड्रेशन महत्वाचे आहे असे संशोधना ने सिद्ध केले आहे. सर्व रोगांपासून मुक्त जीवन हेच ​​आपले ध्येय ठेवायचे असेल तर या मध्ये हायड्रेशन महत्त्वाची भूमिका बजावते.

नवीन संशोधन अभ्यासानुसार शरीरातील सोडियमचे प्रमाण रक्तदाब राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. खूप जास्त सोडियम किंवा सोडियमचे खूप कमी प्रमाण मानवी जीवनासाठी नेहमीच धोकादायक असते. ज्यावेळी आपण पुरेसे पाणी पीत नाही तेंव्हा आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते.शास्त्रज्ञांनी सोडियमचे सेवन आणि रक्तातील जैविक मार्कर यांच्यातील दुवा शोधला आहे.

 संशोधनात केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की शरीरात सोडियमच्या वाढीव पातळीमुळे आपत्कालीन  परिसथिती निर्माण होऊ शकते आणि प्रगत जैविक वृद्धत्वाची चिन्हे दर्शविली जाऊ शकतात. मानवी शरीराच्या जवळजवळ सर्व पेशींच्या कार्यामध्ये हायड्रेशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

 अनेक अभ्यासानुसार,जगभरातील अनेक माणसे पुरेसे पाणी पीत नाहीत ज्याची शिफारस केली जाते.आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी दररोज किती पाणी प्यावे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण जास्त पाणी पिणे विशेषतः जर तुम्हाला एखाद्या  आजारा चा दीर्घकाळा पासून त्रास होत असेल तर ते देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

 उर्जा पातळी आणि मेंदू कार्ये राखण्यासाठी पाणी एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणून कार्य करते.पाण्याचे योग्य प्रमाण एखाद्या व्यक्तीचे वय आणि आरोग्याच्या इतर मापदंडांवर अवलंबून असते.

 डिहायड्रेशनमुळे मानवी शरीराला विविध प्रकारे त्रास होऊ शकतो.

पुरेसे पाणी पिणे हे माणसांसाठी अवघड काम नाही आणि स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण हायड्रेटेड राहिले पाहिजे.

www.wavelets.in हे एक नवीन ऑनलाईन मॅगझीन आहे.आम्ही आपल्याला विनंती करीत आहोत की आमच्या वेबसाईटला एकदा अवश्य भेट द्या, व आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका

Related