तो सध्या (Covid 19) काय करतो ?

Publish Date:8/8/2023 4:04:12 PM


कोविडची चर्चा सध्या कमी जरी झालेली असली तरी हा विषाणू सध्या कोठे व काय करत आहे याची उत्सुकता मात्र संपलेली नाही.

हा विषाणू आजही आपल्या आजूबाजूला आहे का ? हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर होय आहे.जर कोविड विषाणू हा आपल्या आजूबाजूला असेल तर त्यांनी त्याची कार्यक्षमता गमावली आहे का ? असा प्रश्न जर आपल्याला पडत असेल तर त्याचे उत्तर नाही असे आहे.कोविडने त्याची कार्यक्षमता घालवलेली नाही तर मानवी शरीराने त्याला सामोरे कसे जावे हे माणसाच्या शरीरामध्ये असलेल्या इम्युनो सिस्टीम म्हणजेच माणसाची प्रतिकारशक्ती ने ओळखलेले आहे.

मानवाची प्रतिकारशक्ती ही नेहमी नैसर्गिक पद्धतीने तयार होत असते.व हीच प्रतिकारशक्ती आपल्याला कोविड किंवा इतर विषाणूपासून संरक्षण देत असते.एखादा नवीन विषाणू ज्यावेळेला मानवी शरीरात प्रवेश करतो त्यावेळेला मानवी शरीरामध्ये असलेली प्रतिकारशक्ती ला विषाणूशी कसे संघर्ष करायचे याची माहिती नसते.पण हळूहळू मानवी प्रतिकारशक्ती  नैसर्गिकरित्या त्या विषाणूला परतवून लावते.साधे उदाहरण सांगायचे झाले तर एखादा नवीन पाहुणा ज्यावेळी आपल्या घरी येतो त्यावेळी आपला पाहुणा कसा आहे हे आपल्याला माहीत नसते पण कालांतराने आपल्याला त्या पाहुण्या बरोबर कसे वागावे लागेल हे आपण नकळत शिकून जातो.कोविड हा तसाच आपल्या शरीराला एक नवीन पाहुणा होता व या नको असलेल्या पाहुण्याशी कसे वागायचे हे आपल्या शरीराने शिकून घेतले आहे.

मग याचा अर्थ भविष्या मध्ये कोविड आपल्याला कोणतीही हानी पोहोचवणार नाही असे गृहीत धरणे साफ चुकीचे ठरेल किंवा येणाऱ्या काळात कोविड-19 हा आणखीन भयानक रूप घेऊन आपल्यासमोर येईल असे ही म्हणता येणार नाही.पण

कोविड वायरसचे भविष्य काय असेल याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. या वायरसला कायमस्वरूपी नामशेष करण्यासाठी एखादी आणखीन प्रभावी लस शोधून काढणे म्हणजे विज्ञानाला एक आव्हान असणार आहे. एक मात्र नक्की हा व्हायरस आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नवीन रूप धारण करण्याचे नेहमी प्रयत्न करीत राहील.

कोणत्याही वायरसचे अस्तित्व हे सहजपणे व लवकर नामशेष होत नसते. कोविड 19 हा वायरस आपल्या डोळ्याला सहजपणे दिसत जरी नसला तरी तो अतिशय चालाख व तीव्र गतीने आपले रूप बदलण्यात पटाईत आहे.

मनुष्याने आपली प्रतिकारशक्ती नैसर्गिक रित्या वाढविणे हाच उपाय सध्या तरी कोविड विरोधात महत्त्वाची भूमिका पार पाडेल.प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप काही वेगळे करण्याची गरज नाही.योग्य आहार,व्यायाम,व नेहमी हायड्रेटेड (पाणी पिणे) राहणे या साध्या गोष्टी खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतील.

(वेव्हलेट्स डॉट इन हे एक नवीन ऑनलाईन मॅगझिन आहे कृपया आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका)


Related