भारत कर्करोगाची राजधानी का होत आहे ?

Publish Date:7/28/2024 9:17:05 AM

डॉ  प्रकाश चौगुले.

सोप्या भाषेत कर्करोगाची व्याख्या अवंचित पेशीची वाढअशी होऊ शकते.

काही संशोधकांनी भारतात कर्करोगाचे प्रमाण अत्यंत वेगाने पसरत आहे असे नमूद केलेले आहे. 

स्त्रियांच्या मध्ये स्तन व गर्भाशयाचा कर्करोग आणि पुरुषांमध्ये फुफ्फुस, प्रोस्टेट व तोंडाचा कर्करोग हा जास्त प्रमाणात आढळून येत आहे.

भारतीय लोकांमध्ये कॅन्सरचे वाढणारे प्रमाण हे अत्यंत धोकादायक पातळीपर्यंत पोहोचत आहे. 

नुसतेच कर्करोग नाही तर उच्च रक्तदाब, डायबिटीस, हृदयरोग, नैराश्य यासारखे असंसर्गिक रोग देखील जास्त प्रमाणात आढळून येत आहेत.

भारतामध्ये अनेक शहरांमध्ये  प्रदूषणाची उच्च पातळी ही प्रमुख चिंतेची बाब आहे. अनेक अभ्यासकाने हे सिद्ध केलेले आहे की प्रदूषित वायू मध्ये असलेले विषारी कण हे बऱ्याच वेळेला फुफ्फुसाच्या कर्करोगाला आमंत्रण देतात. 

प्रदूषित वायू मध्ये असलेले अनेक घटक हे शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

दुसरे कारण म्हणजे जास्त कीटकनाशके वापरून पिकवलेला भाजीपाला किंवा फळे कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींचे प्रमाण वाढवतात. 

जास्त प्रमाणात मीठ असलेले पाकीट बंद पदार्थ, जंक फूड 

हे सुद्धा शरीरासाठी हानिकारक असतात. पाकीट बंद पदार्थ हा नेहमीच चवदार जरी असला तरी त्यामधे असलेले घटक हे शरीरासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. 

धूम्रपान व तंबाखू तसेच जास्त प्रमाणात दारूचे सेवन हे खूप झपाट्याने वाढत आहे. मानवी शारीरिक रचना ही अत्यंत गुंतागुंतीची जरी असली तरी ती खूप व्यवस्थितपणे आपले कार्य पार पाडत असते. पण एखादा नको असलेल्या पदार्थाचे किंवा पेयाचे सेवन आपण ज्यावळी करतो त्यावेळी मात्र मानवी शरीर कसे प्रतिसाद देईल हे मात्र सांगता येत नाही. म्हणूनच नको असलेले खाद्यपदार्थ किंवा पेय किंवा एखादे व्यसन जास्तीत जास्त टाळण्याचा प्रयत्न करण्यातच शहाणपण आहे.

सुदृढ शरीर निसर्गाने मानवाला दिलेले एक वरदान आहे. मनुष्याने त्या शरीराचे स्वतःहून नुकसान करून घेण्यात पुढाकार घेतलेला दिसतो. 

योग्य आहार, व्यायाम व विचार हे मनुष्याच्या जीवनाचे खरे मित्र आहेत. म्हणूनच ज्या गोष्टी शरीरासाठी अयोग्य आहेत त्या टाळणे फक्त मनुष्यासाठीच नाही तर समाजासाठी देखील हितकारक आहेत.


Related