शिळे अन्न शरीराला चांगली की वाईट?

Publish Date:7/13/2024 8:18:37 PM

 बऱ्याच वेळेला आपण अन्न वाया जाऊ नये म्हणून खाऊन टाकतो मग आपले पोट कितीही भरलेले असले तरीही व आपल्याला अन्न जात नसले तरीही. अन्न वाया कशाला घालवायचे म्हणून आपण अन्नाचे सेवन करतो. आता आपला हेतू कितीही चांगला असला तरीही आपल्या शरीरासाठी तो चांगला आहे का नाही याचा विचार मात्र आपण कधीही करत नाही. आयुर्वेदिक शास्त्रानुसार आपले पोट पूर्णपणे भरेल इतके कधीही अन्नाचे सेवन करू नये असे आयुर्वेद सांगते. जेवताना देखील आपल्या शरीराला पचेल व आपली भूक थोडीशी शिल्लक राहील इतकेच अन्नाचे सेवन करावे असे अनेक तज्ञांचे मत आहे.पोट भरून जेवल्यानंतर देखील ज्या वेळी आपण अन्न सेवन करतो त्यावेळी मात्र त्याचे विषा मध्ये परिवर्तन होते.

 सकाळचे अन्न संध्याकाळी खावे की नाही खावे हा प्रश्न बऱ्याच जणांना सतावत असतो. विज्ञानानुसार अन्न हे नेहमी ताजे असताना खाल्लेले कधीही चांगले. पण बऱ्याच वेळेला चपाती सारखे पदार्थ सकाळीच करून ठेवून रात्री खाल्ली जाते. सकाळी केलेली चपाती रात्री खाणे बऱ्याच जणांना पचते तर बऱ्याच जणांना ती पचत नाही. सकाळी केलेल्या चपाती मध्ये जो पौष्टिक पण असतो तोच पौष्टिक पण चपाती मध्ये रात्रीच्या वेळी देखील असतो. याचाच अर्थ सकाळी केलेली चपाती रात्री आपण खाऊ शकतो पण ती सर्वांनाच पचेल असे काही नाही. प्रत्येक मनुष्याची शारीरिक जडणघडण ही वेगवेगळी असते. सकाळी केलेले अन्न संध्याकाळी खाल्यानंतर ते शरीराला अपायकारक ठरणार नाही की ठरणार हे ज्या त्या व्यक्तीच्या पचन शक्तीवर अवलंबून असते.

 एखादा पदार्थ शिजवून झाल्यावर तो लगेच खाल्लेला कधीही चांगला. बऱ्याच आहार तज्ञाय नुसार सकाळी केलेला अन्न संध्याकाळी सेवन केले तरी काही हरकत नसते. उलट चपाती सारखे पदार्थ सकाळी करून संध्याकाळी सेवन केले तर त्याचा शरिरीला फायद्याचे ठरते.

कोणताही अन्न जास्ती जास्त 8 तासाच्या आत सेवन केलेले कधी ही चांगले.

एकाद्या पदार्थ फ्रीज मधे ठेवून त्याचे सेवन करणे मात्र शरीराला खूप महागात पडू शकते. ज्या पदर्था मध्ये कांद्याचे प्रमाण जास्त आहे तो पदार्थ मात्र लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते. आशा प्रकारचे अन्न मात्र लवकरात लवकर खाणे कधीही योग्य.

शेवटी सकाळीं केलेला पदार्थ संद्यकली आपण नाकीच खाऊ शकतो पण नेहमी तसे करणे अपल्या शरिरासाती योग्यच ठरेल असे मात्र सांगता येणार

Related