तुम्ही तुमच्या मोबाईल फोनचे व्यसनी आहात का? उत्तरे शोधण्यासाठी खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

Publish Date:7/25/2023 5:12:22 PM



मोबाईल फोन ही दैनंदिन जीवनाची गरज बनत चाललेली आहे.पण आम्हाला या उपकरणाची इतकी सवय झालेली आहे की ही सवय आता व्यसन बनत चाललेली आहे.तर चला पाहूया आपण मोबाईल फोनचे व्यसनी आहात का?

1  तुम्ही रात्री झोपताना तुमचा  मोबाईल फोन तुमच्या बेड शेजारी ठेवून झोपता का?

2  तुम्ही सकाळी उठल्या उठल्या आपल्या मोबाईलचा डाटा ऑन करून नवीन मेसेजेस आले आहेत काहे पाहता का?

3  जेव्हा कोणी तुमचा मोबाईल फोन  घेतो त्यावेळेला तुम्ही अस्वस्थ होता का?

4  तुमचा मोबाईल तुमच्याजवळ आहे हे पाहण्यासाठी तुम्ही सतत आपल्या शर्टाच्या किंवा पॅन्टच्या खिशात हात घालता का?

4  जेव्हा तुमचा मोबाईल फोन अगदी थोड्या सेकंदासाठी कार्य करत नाही त्यावेळी तुम्ही बेचैन होता का?

5  तुम्ही जर अर्ध्या तासाने तुमचा सोशल मीडिया मेसेज वाचता का?

6  तुम्ही तुमच्या मोबाईलवर दररोज    दोन तासापेक्षा जास्त वेळ देता का?

7  कोणत्याही संदेशाची सूचना आल्यावर तुम्ही तुमचा मोबाईल लगेचच तपासता का?

8 जर तुमच्या मोबाईलचा डाटा संपला असेल तर लगेच तुम्ही डाटा रिचार्ज करता का?

9  कारण नसतानाही तुम्ही तुमचा मोबाईल हँडसेटनेहमी हातात धरून ठेवता का?

वरील पैकी जरी पाच किंवा अधिक प्रश्नांची उत्तरे होय असतील तर नक्कीच तुम्हाला मोबाईलचे व्यसन लागलेले आहे .

(जर अशा प्रकारची नवीन माहिती हवी असेल  तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरु नका.वेव्हलेट्स. इन हे एक नवीन ऑनलाईन मॅगझिन आहे)


Related