दही शरीरासाठी योग्य की अयोग्य.

Publish Date:3/1/2024 4:18:55 PM

दही शरीरासाठी योग्य की अयोग्य.

   डॉक्टर प्रकाश जाधव.

दही, दूध, तूप ,मध व शर्करायुक्त पंचामृतात दही समाविष्ट आहे. दही दुधापेक्षा अधिक गुणकारी आहे.उत्तम रीतीने लागलेले व फारसे आंबट नसलेले दही उत्तम समजले जाते. कोणताही पदार्थ जर योग्य प्रमाणात खाल्ला तर त्याचे दुष्परिणाम होत नाही, पण एखाद्या पदार्थाचा जर अतिरेक झाला तर मात्र शरीर ते सहन करू शकत नाही.

दही देखील थोड्याच प्रमाणात खावावे असा इशाराही आयुर्वेदाने दिला आहे. दही हा प्रकार थंड आहे असा एक मोठा गैरसमज रुजला आहे जो चुकीचा आहे. म्हणून उन्हाळ्यात दह्याची लस्सी करून सेवन केली जाते ते  प्रामादिक आहे. दही थंड नसून उष्ण आहे त्याचा युक्तीपूर्वकच आहारात समावेश व्हावा नाहीतर अनेक व्याधीना समोर जावे लागेल.

दह्याचे गुणधर्म

मधुर अमल व अति अमल असे दह्याचे तीन प्रकार संभवतात. मधुर दही अति  कफ व मेद वाढवते. साधारण आंबट दही कफ पित्त वाढवते अति आंबट दही रक्तदोष कारक असते.अधमुरे दही मलमुत्राचे प्रमाण वाढवते व त्रिदोष प्रकोपक असते.

दही किंचित तुरट, उष्ण विर्यात्मक, मधुर चवीचे,अम्ल असून स्निग्ध आहे. तसेच दही हे. शुक्रधातू, बल, मेदवृद्धी कर आहे

दही आम्ल व उष्ण असल्याने पित्त वाढून आम्लपित्त चा त्रास होतो

वारंवार दही सेवनामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून मेदधातू वाढतो. कफ  प्रकृती असणाऱ्याने पडसे होत असेल तर दही खाने टाळावे. दमेकरी मधुमही व उष्णतेचे भास होणाऱ्या पित्त प्रकृतीच्या लोकांनी दही वर्ज करावे. वात प्रकृतीच्या कृश लोकांनी मात्र दही खाल्ल्यास वजन वाढवण्यासाठी चांगला उपयोग होतो. लहान मुलांना वरचेवर दही व साखर दिल्यास आतड्यामध्ये जंत होऊ शकतात.

थोड्या प्रमाणात दुपारच्या जेवणात खाल्लेले दही शरीरास पोषक ठरते.

दह्यामध्ये कॅल्शियम विटामिन बी 12 विटामिन सी तसेच प्रोटीन्स असतात तसेच दह्यामुळे आतड्यामधील चांगल्या जिवाणूंची वाढ होते

दही रात्री खाऊ नये .दही गरम करून देखील कधीच खाऊ नये असे आयुर्वेदाने पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे. तसेच अर्धवट विरजलेले दही ही खाऊ नये. फ्रिज मधील दही तर अत्यंत दुष्परिणाम करते शिवाय दही मिसळ किंवा दही वडा यासारखे पदार्थ देखील शरीरासाठी हानिकारक असतात.

दही शरीरासाठी नक्कीच उपयुक्त आहे पण त्याचे सेवन मात्र मोजून मापून केले पाहिजे.


Related