पृथ्वीच्या अस्तीत्वा साठी पक्षी जगणे महत्वाचे आहे.

Publish Date:11/21/2023 9:52:17 PM


फक्त आपले सुंदर स्वरूप व निसर्गशी सुसंगत राहणरे पक्षी पृथ्वीच्या अस्तीत्वा साठी किती महत्वाचे आहेत याचा विचार मनुष्याने कधी केलाला नाही.पक्षी फक्त दिसायला सुंदर नसतात तर त्यांच्या कडे अफाट  बुध्दिमता देखील असते असे विज्ञानाने अनेक वेळा सिद्ध केले आहे.

चतुर कावळ्याची गोष्ट आपण सर्वानी लहानपणी एकलेली आहे. पण कावळ्या मध्ये न्युरॉन ची संख्या जास्त प्रमाणात असते ज्यामुळे कावळा जटिल कार्य सहजपणे करु शकतो हे आपल्याला माहित नाही. प्रत्येक पक्षाचे एक वैशष्टिय आहे.

प्रत्येक पक्षाला मनुष्याची सवय झालेली आहे.

 पक्षी साधारणपणे वर्षाला हजारो टन कीटक खातात. ही कीटक  फक्त वनस्पतींनाच नव्हे तर प्राण्यांना आणि शेतीला देखील नुकसान पोहोचू शकतात.

 अनेक पक्षी फळ खातात व फळांच्या बिया दुसऱ्या ठिकाणी टाकून फळझाडांच्या वाढीस मदत करतात.अनेक पक्षी बऱ्याच वनस्पतींच्या पुनरुत्पादन साठी जबाबदार आहेत.

 पक्षांच्या शिवाय पृथ्वीचे निसर्गचक्र हे पूर्णपणे कोलमडून पडेल.

 अनेक प्रकारचे पक्षी सध्या अस्तित्वात जरी असले तरी हळूहळू पक्षांची संख्या ही कमी होत चाललेली आहे. वाढत चाललेले शहरीकरण, हवेचे प्रदूषण व निसर्गामध्ये होत चाललेले बदल पक्षांच्या अस्तित्वासाठी धोकादायक बनत चाललेले आहे.

 काही पक्षांच्या प्रजाती तर नामशेष झाल्या आहेत तर येणाऱ्या काही वर्षात अनेक प्रजाती नामशेष होतील. पृथ्वीतलावर जर पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आले तर मनुष्य जातीचे जगणे खरोखरच अवघड होईल. पृथ्वी नेहमीच जिवंत राहण्यासाठी निसर्गाने एक निसर्ग चक्र तयार केले आहे या निसर्गचक्रामध्ये पक्षांच्या बरोबर प्राण्यांना देखील एक अत्यंत महत्त्वाचे घटक मानले गेले आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टी ही एकमेकावर अवलंबून आहे ज्यामध्ये पक्षी, प्राणी, वनस्पती. पाऊस, ऊन, यासारख्या घटकापासून पृथ्वी सजीव झालेली आहे. प्रत्येक घटकाचे एक महत्त्व आहे जे या निसर्गचक्राला घट्ट बांधून ठेवलेले आहे. या सर्वांचा समतोल  म्हणजेच मनुष्य जातीचे जगणे होय.

 पक्षांचा जीव हा अतिशय नाजूक असतो. हवेमधील प्रदूषण असो किंवा पाण्यामधील प्रदूषण पक्षांच्या होत असलेल्या विनशासाठी या दोन्ही गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत.

 पक्षी म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेला एक वरदान आहे  पण दुर्दैवाने मनुष्याने याचा विचार कधीच केलेला नाही. पक्षांचे अस्तित्व टिकवण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्याचा विचार करण्याची आज गरज आहे.

Related