जास्त मीठ खाण्याची सवय कशी सोडवावी.

Publish Date:2/29/2024 10:52:36 PM

जास्त मीठ खाण्याची सवय कशी  सोडवावी.

योगेश पाटील


भारतीय लोकांचे मीठ खाण्याचे प्रमाण अत्यंत घातक आहे.

मिठाचे जास्त प्रमाण सेवन करणे म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे . बिस्किट ,डबा बंद भाज्या ,प्रोसेस फुड, लोणचे, बटाटा चिप्स व अनेक पाकिट बंद पदार्थ यांच्यामध्ये मिठाचे प्रमाण हे खूप प्रमाणात आढळले जाते.

मिठाचा सर्वात दुष्परिणाम म्हणजे वाढणारा रक्तदाब. मीठ हे हृदयासाठी अत्यंत घातक  सिद्ध होऊ शकते.

किडनीचे अनेक विकार देखील ज्यादा मीठ खाल्याने उद्भवू शकतात.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार पाच ग्रॅम मिठाचे सेवन हे अपेक्षित आहे. परंतु हेच प्रमाण भारतामध्ये साधारणपणे आठ ग्रॅम सेवन केले जाते.

भारता मध्ये हृदय विकरा मुळे येणाऱ्या मृत्यू चा दर हा इतर अनेक देशपेक्षा जास्त आहे .जास्त प्रमाणात मिठ खाण्यामुळे उच्च रक्तदाब ची आजार होणे स्वाभाविक आहे.

फास्ट फूड मध्ये असलेले मिठाचे प्रमाण हे तर अत्यंत धोकादायक आहे.

घरात केलेल्या स्वयंपाकामध्ये मध्ये देखील मिठाचे प्रमाण  वाढत आहे.जास्त करून लोणचे हा प्रकार चवीला जरी छान वाटत असला तरी तो शरीरासाठी घातक ठरू शकतो.

 चायनीज फूड खणायचे प्रमाण देखील वाढत चालले आहे.प्रत्येक चायनीज पदार्थांमध्ये मध्ये मिठाचे प्रमाण हे प्रमाणापेक्षा जास्त आहे.

मीठ ला पर्याय शोधण्यापेक्षा मिठाचे प्रमाण कमी करणे हे कधीही शरीरासाठी फायदेशीर आहे.

सोडियम हा मिठाचा प्रमुख घटक आहे व हाच घटक शरीरासाठी हानिकारक  आहे. आज लो सोडियम मीठ सुधा बाजारामध्ये उपलब्ध आहे  पण 

त्याच्या मध्ये पोटॅशियम चे प्रमाण खूप अधिक असू शकते व ते देखील शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

बऱ्याच वेळेलेल मिठाचे प्रमाण अन्नाची चव  वाढवण्यासाठी वाढवले जाते .कोणत्या ही अन्नाची चव ही बऱ्याच प्रमाणत मनुष्याच्या मानसिकतेवर देखील अवलंबून असते. मिठाचे प्रमाण जास्त असेल तरच  अन्नाला चव येते हा विचार करणे चुकीचे आहे.

मग नेमके काय करावे

सर्वप्रथम आपण जे अन्न खातो त्यामध्ये मिठाचे प्रमाण थोडेसे कमी करावे.मानवी शरीर हे मनुष्याच्या मानसिकतेवर  खूप अवलंबून असते.सुरवातीला थोडेसे अन्न बेचेव जरी लागले तरी थोड्या दिवसाने तेच मिठाचे प्रमाण आपल्याला योग्य वाटेल .नंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग करून अजून एकदा मिठाचे प्रमाण आणखीन थोडेसे कमी करावे  .काही कालावधीनंतर तुम्हाला जेवणामध्ये मिठाचे प्रमाण कमी झाले असे असे वाटणार नाही.

मीठ हे शरीरासाठी आवश्यक नक्कीच आहे पण त्याचे प्रमाण मात्र मोजूनमापून केले पाहिजे.

शेवटी अन्नामध्ये असलेला प्रत्येक घटक शरीरासाठी उपयुक्त आहे पण त्याचे प्रमाण योग्य असले पाहिजेल मग ते मीठ असो किंवा  सखर.

Related