अल्कोहोलचा मानवी मेंदूवर कसा परिणाम होतो.

Publish Date:7/9/2023 8:39:30 AM

अल्कोहोल चा मानवी मेंदूवर कसा परिणाम होतो.

जगभरात अल्कोहोल चे सेवन वाढलेले आहे.काहीजण आपण अल्प प्रमाणात दारू पितो अशी स्वतःची समजूत काढत असतात पण नुकताच लँनसेट मेडिकल जर्नल ने केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की अल्प प्रमाणात दारू देखील शरीराला अपायकारक आहे.40 ते 64 या वयोगटात दारू घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे असे या संशोधना ने सिद्ध केले आहे.

अल्कोहोल चा मानवी शरीरावर खूप खोलवर परिणाम होतो.अल्कोहोल शरीरात खूप वेगाने शोषून घेतले जात असते.मद्यपान केल्यानंतर मानवी वर्तणूक ही मनुष्याचे वय व अल्कोहोल च्या प्रमाणावर अवलंबून असते.जर उपाशी पोटी दारूचे सेवन केले असले तर अल्कोहोल वेगाने शरीरात शोषून घेतले जाते,पण एखाद्याने जर अन्न खाऊन अल्कोहोल चे सेवन केले असले तर अल्कोहोल शरीरात हळूहळू शोषून घेतले जाते.अल्कोहोल लहान आतड्या मध्ये म्हणजेच स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जास्त प्रमाणात शोषले जाते ,इथून अल्कोहोलचा प्रवास लिव्हर व शरीराच्या इतर अवयवा पर्यंत रक्ताच्या माध्यमातून पोहोचतो.

अल्कोहोल ज्या वेळेला मेंदूपर्यंत पोहोचते त्या वेळेला मात्र मेंदू ची प्रतिक्रिया फार वेगाने सक्रिय होते. विशेष म्हणजे अल्कोहोल  नेमके कोणत्या पद्धती ने मेंदूचे कार्य प्रभावित करते याचे तंतोतंत विज्ञान अजून सुद्धा अस्पष्ट आहे.पण ठराविक रसायनिक प्रक्रिया ही कशा पद्धतीने घडते याची मात्र माहिती विज्ञानाने स्पष्टपणे सांगितले आहे.

मेंदू ची रचना अतिशय गुंतागुंतीची आहे.

मेंदू मध्ये लाखो न्यूरॉन असतात जे ट्रान्समीटर म्हणून कार्य करत असतात.

मेंदूतले न्यूरॉन हे दोन प्रकारचे असतात प्रतिबंधक व उत्तेजक, या दोन प्रकारच्या न्यूरॉन मध्ये संतुलन असणे आवश्यक आहे.अल्कोहोल या दोन्ही न्यूरॉन मधील संतुलन बिघडवते व मेंदूला आपली कार्यपद्धती विसरून जाण्यास भाग पाडते.उत्तेजक न्यूरॉन इलेक्ट्रिकल सिग्नल फायर करून सिग्नल प्रसारित करतात तर प्रतिबंधक न्यूरॉन सिग्नल फायरिंग आणि रिस्पॉन्सिव्हनेस दडपतात.म्हणजे या दोन्ही न्यूरॉन चे कार्य एकमेकांच्या विरोधातले असते व दोन्हीं चे योग्य संतुलन असल्यावरच मेंदू आपली कार्यपद्धती योग्य प्रकारे करू शकतो.अल्कोहोल उत्तेजक न्यूरॉन चे कार्य कमी करते तर प्रतिबंधात्मक न्यूरॉन चे कार्य वाढवते.

अशाप्रकारे अल्कोहोल मेंदूच्या संतुलना मध्ये अडथळे निर्माणे करते.ज्या वेळेला या दोन प्रकारच्या न्यूरॉन मधील संतुलन बिघडते त्यावेळी मेंदू आपली कार्यपद्धती योग्य प्रकारे करू शकत नाही.निरर्थक बडबड,खूप उत्साह किंवा खूप शांत राहणे शारीरिक नियंत्रण न राहणे,ही सर्व क्रिया मेंदूचा या दोन प्रकारच्या न्यूरॉन मधील असंतुलना मुळे होते.

जर कोणी नियमितपणे अल्कोहोलचे सेवन करत असेल तर मात्र या दोन प्रकारच्या  न्यूरॉनच्या संतुलना मध्ये कायम चढ उतार होतो  व मानवी मेंदू हा नेहमी या दोन प्रकारच्या न्यूरॉन मध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो पण अल्कोहोल त्यामध्ये व्यत्यय आणतो.अशा प्रकारे अल्कोहोल मानवी मेंदूला त्याच्या कार्यपद्धती मध्ये समतोल आणण्यास अडथळा निर्माण करतो.


Related